ओढ पावसाची
ओढ पावसाची


ओढ त्याची का छळावी, मनी स्पंदने उमटावी
गार वाऱ्याची झुळूक यावी, शहारे कुशीत मी निजावी
ओढ पावसाची का छळते मला ।।धृ।।
हिरवा शालू पांघरुणी नवलाई जणू शोभे
धुक्यातुनी मी तुला शोधे ,हुरहुर मज लागे
ओढ पावसाची का छळते मला ।।1।।
देहापरी चिंब भिजूनी, उंच घ्यावे झोके
आनंदपरी अश्रू नयनीं कसे फुले
ओढ पावसाची का छळते मला ।।2।।
आभाळाशी तुझं नातं सात जन्मासाठी
जमिनीशी विरह मात्र काही महिन्यांसाठी
ओढ पावसची का छळते मला ।।3।।