STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3  

Shila Ambhure

Romance

प्रेमरीत

प्रेमरीत

1 min
97

सागराच्या

तळालागी

लपल्याले

जागोजागी.


शिंपल्यात

निजलेले

मोती गोल

सजलेले.


चकाकतो

शुभ्र रंग

मखमली

मऊ अंग.


मोती ऎसे

सापडोनि

सुबक ते

निवडोनि.


आणिले मी

तुजसाठी

उभा आहे

दर्या काठी.


आगळी ही

माझी रीत

स्वीकार गं

माझी प्रीत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance