रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस


रिमझिम पाऊस आला
ओली चिंब झाली धरा
मृग नक्षत्राच्या येण्याने
पाऊस पडला छान बरा.
सोसाट्याचा वारा सुटला
तांडव नृत्य झाले वृक्षांचे
पाला-पाचोळा उडाला
गोंधळ उडाले लोकांचे.
ढगांचा तो कडकडाट
विजेचा ही चकचकाट
काळे मेघ बरसले धरा
केला त्यांनी थयथयाट.
बळीराजा सुखावला
पेरणी कामी तो लागला
ढवळ्या पवळ्या संगती
नांगरणी करू लागला.
डोंगर कपारीतुनी वाहू लागले
लहान मोठे झरे शुभ्र पाण्याचे
अवनी ही सजली नटली छान
नेसुनी शालू हिरव्या बुट्यांचे.
रिमझीम पाऊस तो बरसावा
मनसोक्त पावसात चिंब भिजावे
स्वतःस विसरुनी रिमझीम पावसात
मस्त मस्त ते गावे अन् नाचावे.