हे गणेशा
हे गणेशा
*हे गणेशा*
हे गणेशा मोरया स्वीकार अमुची वंदना
उत्सवाला पाव बाप्पा नाच माझ्या अंगणा.
काय गोंधळ काय बोलू बंद झाले बोलणे
माणसाची केवढी ही चाललेली वंचना
देव बाप्पा एक इच्छा कर पुरी तू आमची
ठेव प्रामाणिक सदा तू माणसांच्या भावना
काय मी सांगू तुला रे जाण माझ्या भावना
जो कुणी मागेल त्यांच्या पूर्ण कर तू कामना
भालचंद्रा दुष्ट वृत्ती माणसांची संपवा
नेत जावे योग्य मार्गी हीच माझी प्रार्थना.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
