आठव येता तुझा
आठव येता तुझा
मज आठव येता तुझा
डोळ्यात चंद्र झिरपावा.
मनात माझ्या मक्रंदाचा
मखमली मेघ बरसावा .....
प्राणा तूनी साद भरावी.
अवकाश व्यापूनी जावी.
संदेश घेऊनी यावा,
मज एक पोपटी रावा
स्वप्नात ही स्वप्न बघावे.  
;
मी तुझ्यात रंगुनी जावे.
झोपेतून जागी होता,
मजपुढती तूच असावा.
ही एक सानुळी आस.
मोहरली आज मनात
प्रीतीचा अल्लड झोका
भेटीत तुझ्या झुळवावा