STORYMIRROR

Purva Patil

Romance

4  

Purva Patil

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
17.8K


प्रेमात म्हणतात; सगळं काही माफ असतं,

एक नजर त्याची; ज्यात सामावलेलं आपलं जग असतं .


आता तरी तो दिसावा हे डोळे आणि मनाचं एकमत असतं,

काही का असेना तो एकच आपलं मन असतो.


वाटतं त्याला आताच जाऊन सांगावे,

काय होईल नाही ते नंतर पाहावे.


भावनांना मर्यादा देणं कठीणसे वाटतंय ,

नजरेनं बोलूनही ओठांनी सांगावंसं वाटतंय .


त्याच्याशी बोलायचे ठरवूनही स्वतःशीच बोलत रहाते ,

त्याने होकार दिल्याचं स्वप्नातच पहात रहाते .


मी फक्त देवालाच सांगते,

त्यालाही माझ्यासारखंच वाटू दे; म्हणून त्याच्याशी भांडते.


मी माझं मन नाही मांडू शकत त्याच्यापुढे,

पण वाटतं की; तोच स्वतःहून येईल का माझ्याकडे?


मनात, श्वासात, प्रत्येक विचारात तोच असतो,

कितीही दूर जरी गेले तरी पहिलं प्रेम हे शेवटी पहिलंच असतं .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance