STORYMIRROR

Purva Patil

Inspirational

4  

Purva Patil

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
4.5K


जीवनात हे एकच नाते असावेसे वाटते,

जे विसरुनही परत आठवावेसे वाटते.

क्षणात मन होते आभाळ आठवणींनी भरून जाण्यासाठी,

तुला आणि मला संगे त्या नभी नेण्यासाठी.

सारी अलगद ओघळतात गालांवरुनी अश्रु बनुनी,

दुरुन हा एकच धागा जोडतो व्यक्तींना मैत्री म्हणुनी.


भावनांचे हे गाठोडे सोडून द्यावयासे वाटते,

कोणी दोस्त आहे का? म्हणून चोहीकडे पहावयासे वाटते.

क्षणात मन येते तुझ्यापाशी, तुला सर्वकाही सांगण्यासाठी,

तुझ्यासमेत नवीन आठवणी भरून घेण्यासाठी.

आणि हळूच मन हसते चेहऱ्यावर स्मित बनुनी,

दुरुन हा एकच धागा जोडतो व्यक्तींना मैत्री म्हणुनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational