वसंत
वसंत
मधुर सुगंध हृदयी घेऊनी फुलला आहे वसंत,
सोनेरी पंख पांघरुनी बघा; कसा उजळला आहे आसमंत.
धुके झटकुनी पहाट म्हणती घेऊ दे थोडी उसंत,
हळूहळू एकरूप होती पानांवरील मोतीरूपी थेंब.
किलरिव पक्ष्यांचा ऐकू येता शहारते अंग,
अन् मागोवा घेते चित्त शोधाया दृष्टीसंग.
दुपार जाते; सांज जाते; काळ जातो अनंत,
अन् मग रात्रीची दुलईही हळूहळू पसरू पहाते अंग.
स्वप्नांच्या दुनियेत मग मनही होते दंग,
अन् चित्तही भरते आपल्या स्वप्नात वसंतरूपी रंग.
