STORYMIRROR

Purva Patil

Fantasy

3  

Purva Patil

Fantasy

पर्जन्यऋतू

पर्जन्यऋतू

1 min
183

पर्जन्यधारा; तो गारगार वारा,

आहे व्यापित हा सारा पसारा. 


चिंब चिंब धरणी ती भासतसे मनमोहक,

मेघही आहेत राग मल्हार आळवित.


सप्तरंगी इंद्रधनु थिजले त्या आसमंतात,

अन् चिमुकली पाखरे गडप झाली घरटयात. 


मोतीरुपी थेंबांनी पाने गेली ती सजून,

मुले निरागस अशी ती गेली या सरींसवे हरखून. 


थंडगार हा वारा उमटवत आहे मृदुल शहारा,

आहे शमवित दाहकता; आवेग भावनांचा सारा. 


गुंगून गेले मन कित्येकांचे त्या पहिल्या पावसाच्या आठवणींत,

तर शोधू लागले कित्येक जण त्या तिला त्या वेडया सरींत. 


पर्जन्यऋतू हा आगळा; असतो सदैव हृदयानजीक,

कारण फक्त देहालाच नाही तर चित्तालाही असतो तो तोषवित.   

       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy