STORYMIRROR

Purva Patil

Others

4  

Purva Patil

Others

शुभ दीपावली

शुभ दीपावली

1 min
389

पणत्यांची आरास अंगणात सजली,

आकाशकंदिलातुनी सोनकिरणे चहुकडे उधळली


अभ्यंगस्नानाचा शुभमुहूर्त समीप आला,

तेल आणि उटण्याचा तो सुगंधच न्यारा


खुसखुशीत फराळाचा स्वाद जिभेवर रेंगाळणारा,

आप्तेष्टांसोबतचा हा वेळ आनंदी सारा 


लक्ष्मीकुबेराची मनःपूर्वक केलेली पूजा, प्रार्थना,

पाडव्याच्या दिवशी फुललेल्या त्या बाजारपेठा 


भाऊबीजेच्या निमित्ताने आणखी दृढ होणारं भावाबहिणीचं नातं,

शेवटी तुळशीविवाहाने हे मंगलपर्व पूर्ण होतं 

   

नेहमीसारखाच याही दीपावलीला दूर होऊ दे मनातील अंधार,

येऊ दे नव्या उत्साहाला, आशेला उधाण 


सुख, सफलता नेहमी तुमच्या जीवनी नांदो हीच इच्छा,

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


Rate this content
Log in