Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Pande

Romance


3  

Sanjay Pande

Romance


ये मिठीत माझ्या

ये मिठीत माझ्या

1 min 279 1 min 279

पावसात तुझ्या सवे

मजा वाटते भिजतांना

काळीज धडधडते

ओठावर ओठ ठेवतांना।।


अंगावर येतात शहारे

तुझ्याशी ग खेटतांना

मन आनंदीत हे होते

तुझ्याशी ग भेटतांना।।


गालावर खळी उमलते

तू जोरात ग हसतांना

नाहीच करमत मला

तू नजरेसमोर नसतांना।।


तुझा लटका राग भारी

दिसतो बघ तू रुसतांना

प्रेमाची जाणीव होते ग

तूझे आसवे पूसतांना।।


मन आतूर होत असते

तुला नेहमी ग पहातांना

मला समाधान मिळते

तुला ग मिठीत घेतांना।।


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay Pande

Similar marathi poem from Romance