व्हायरस
व्हायरस
1 min
615
या कोरोना व्हायरसनं
रस शब्दाचीच वाटते भिती
रस नाही वाटत कशातच
अशी झाली आहे स्थिती।।
मला मनापासून आवडतो
खायला मस्त आमरस
आता वायरसच्या धाकाने
घेत नाही ताटात रस।।
सगळे जीवनच आता
न जाणो का वाटते निरस
सांगता येत नाही कधी
करोना होईल ते सरस।।
हाथरस ला जाण्याचा
ही रद्द केला माझा बेत
सोमरस ही आता मी
कधीच नाही भाऊ पेत।।
सांगता येत नाही हा
करोना कधी मारल धक्का
व्हायरस चा प्रत्येकाच्या
जीवाला धोका आहे पक्का।।
हास्यरसाच्या कविताही
ऐकतांना येतो अंगावर काटा
रस या शब्दालाच आता
करावा म्हणतोय मी टाटा।।
