STORYMIRROR

Sanjay Pande

Others

4  

Sanjay Pande

Others

संक्रान्त

संक्रान्त

1 min
369

किती ही द्या तीळगुळ

लोक कडवट बोलणार

वेळ आली की लगेच

शब्दाचे बाण सोडणार।।


मोठी रक्कम देऊन ही

येथे तर होतात बेईमान

सांगा फ़क्त तिळगुळावर

हे कसे काय मानणार।।


दिलेला शब्द पाळणारे

श्रीराम आता कुठे मिळणार

मतलबी अन स्वार्थी पणाने

नात्याची दोरी येथे तुटणार।।


हातावर तिळगुळ देऊन

बघितले गळा घोटणारे

आपल्या मतलबासाठी

बघितले तळवे चाटणारे।


बोलण्यासाठी गोड गोड

तिळगुळा ची कशाला भेट

ज्याच्या रक्तात हरामखोरी

त्याला भिडावे कायम थेट।।


भले नका देऊ तीळगुळ

दाखवून कोणाला लळा

पण गॉड गोड बोलून

कोणाचा नका कापू गळा।।


Rate this content
Log in