पदर ढळतांना
पदर ढळतांना
1 min
127
कित्येकांना केले घायाळ
पदर तुझा ग ढळताना
सांग तुला कसे वाटते
पुरुषांना असे ग छळतांना।।
मी ही पडलो प्रेमात पाहुन
पदर तुझा ग तो उडतांना
भले चुकलो असेल मी थोड़ा
तुझा ग स्वभाव मी ताडतांना।।
आज ही मला आठवतो
तुझा तो चेहरा गांगरलेला
पदर सारतांना तुझ्या
डोळ्यात डोळा मिसळलेला।।
एकच मागणे करतो तुजपाशी
असा नको ना पदर देऊ ढळु
परत कोणा पुरुषाला अशी
नको ना ग तू आता छळु।।
