झंकारले गीत
झंकारले गीत
झंकारले गीत माझे
तूज साठीच साजणा
भावनेचे शब्द सारे
सांडले रे, जाण ना !!
आळविते रे, गीत मी
तूज सामोरी पुन्हःपुन्हा
भावना जाणून घे रे
क्षणभरी तू थांबना !!!
वाटेकडे तुझ्या रे
नयन माझे लागले
पाहून वाट तुझी
शीणतो रे जीव ना !!
वाटते रे , धावून यावे
तव मिठीत , मी धुंद व्हावे
क्षण क्षण तो धुंद व्हावा
येशील कधी तू , सांगना !!

