मधुर क्षण
मधुर क्षण
1 min
441
सांजेच्या मावळत्या प्रकाश किरणांत न्हाहून
भासे लोभस लावण्य तिचे ते अप्सरेहून...
गोड लाजली ती गुलाबी गारव्यात
क्षणही आतुरला चंदेरी चांदण्यात...
आश्वासक स्पर्शाचे अर्थ उलगडले
गुपित अंतरीचे ह्रदय खोलू लागले...
बहरत होती गर्द ती काळोखी रात्र
निद्रिस्त कवेत पुलकित झाले गात्र...
गंधाळले श्वास श्वासांत लागले घुलू
ओठ त्या अबोल ओठांशी लागे बोलू...
सुगंधी मिठीत त्या रात्र सारी गेली सरून
बरसलेल्या प्रेमसरी उष:काळी गेल्या विरून..
हवेतील गारव्याने येता जाग हलकेच
लुप्त झाले मधुर क्षण होते आभास सारेच...