एक ओळ तुझ्यासाठी
एक ओळ तुझ्यासाठी


एक ओळ तुझ्यासाठी
बोलू काही गोड शब्द
नाजुक बोल तुझेच
मनाला करते स्तब्ध
मनाला करते स्तब्ध
तुझे ओठातले बोल
जसे लपले गुपीत
रसभरीत अबोल
रसभरीत अबोल
माझ्या हृदयी अर्पण
प्रतिमा तुझी सुंदर
दिसे हृदयी दर्पण
दिसे हृदयी दर्पण
माझे तुझे प्रतिबिंब
छबीदार सुरेख ते
गुंफले गोड शब्दात
गुंफले गोड शब्दात
बसले प्रित फुलात
कवी मन तुझे माझे
शब्द गंध हृदयात