निराशा
निराशा
निराशा कधी कधी आयुष्याचा खेळ बनते
न सांगता आपलं कुठे तरी चुकते
भविष्याचं कोडं सुटलं नाही म्हणून
जीवाचा अंत करणे का? म्हणून
सुरळीत आयुष्य जगता यावं म्हणून
त्यात चढ-उतार येतच राहीन
कुठेतरी कुजबुजल्यागत एकटं होणं
आणि अखेरचा श्वास घेणं
कधी निराशा आल्यावर, स्वत:शी थोडं हसुन घ्यावे
गदरोळणारे विचार सोडून द्यावे
पुन्हा नव्या उमेदीने स्वप्न गवसावे
मनाच्या ताकदीला जागवावे
मिटल्यावर कुठले काय होते
सगळं काही क्षणभंगुर असते
सगळेच कोणी बे आधार नसते
कधी कधी स्वत:लाचं स्वत:चा आधार बनावे लागते