माय
माय
जीवनाच्या परिघातल्या भावना
कधी क्षणा वेगळ्या होतात
माय पाखरांची, लेकरांची म्हणतं
अविरत शब्द सुचतात
माय आसवांची धार होते
माय काळजाची हाक होते
माय आपल्यासाठी जगते
कधी दिव्याची वात होत लख्ख प्रकाश देते
माय सुखाची सावली
दु:खं तारून होते आधार
माय धरणीची लेख
जसं बहरतं शिवार
माय जीवनाचा सार
होते लेकरांचा संस्कार
माय भावनांचा हुंकार
देते जगण्याला आकार
माय शब्दांची आरास
जसा भुई अंकुर उमलला
करते माती, नातीशी जिव्हाळा
माय हा शब्द पोहोचतो काळजाला