राष्ट्रभक्ती
राष्ट्रभक्ती
भारत भु चे शुर विर ते,प्राण अर्पण करती...
थैमान माजले दृष्टांचे,
हाहाकार करती
शिर हातावर घेऊनी,
सैनिक सिमेवरती लढती
देशाप्रती बलिदान त्यांचे,
सदैव अमर असतील
शुर विर ते मातृभुमीचे,
रणी रक्त ते सांडतील
प्राणासाठी नाही झुकले,किती अफाट राष्ट्रभक्ती...
थरथरले शत्रु आता,
मैदान सोडूनी पळले
शुर,विर झुंजार होऊनी,
त्या अजाण शत्रुस कळले
दु:खाला ही गोड मानुनी
नाही देश प्रेम विसरले
आवाहनांना सामोरे जाता,
नाही कुटनितीला हरले
राष्ट्रभक्ती पुन्हा पुन्हा, सिंह गर्जना करती
स्वातंत्र्याचे सुवर्ण पर्व
एक होऊया सर्व
ती राष्ट्रभक्ती पाहुनी मझं,
वाटतो शुर,विरांचा गर्व
पेटली मशाल आता
उजळेल नव क्रांतीचे तेज
घडतील ह्या भुमीत योध्दे
रूजतील विचार,नितीचे बीज
हि पहाट शुर विरांची, महान त्यांची किर्ती