भारतीय संस्कृती
भारतीय संस्कृती
भारत महामानवतेचा सागर
करूया इथल्या संस्कृतीचा जागर
युवा चैतन्य स्वप्न भारताचे
तेज संक्रांतीचा रुजवू विचार
पिढ्यानपिढ्या संस्कार या मातीचा
जयघोष संस्कृतीचा होत असे
रक्त सांडले शुर विरांचे
प्राणाचा इथे स्वार्थ नसे
उठ युवा, जाग जरा
शोध घे नव्या उत्कर्षाचा
जाण इथल्या संस्कृतिला
तव कळेल सुवर्ण इतिहास भारताचा
युवा मस्तकी तेज असावे
कल्पतरूचे बीज रूजावे
अर्थ, उन्नती, आत्म गुणांनी
युवा भारताचे स्वप्न साकार व्हावे
कणा-कणातली सुसंस्कृति
युवा मनाला कळावी
विवेकाचे विचार उजळूया
त्यात आत्मानुभूती मिळावी
धर्म,पंत,जाती एकीने
भाषा प्रांत अनेक
ममतत्वाचा अंश त्यात
मानवतेच्या हृदयात भारत देश एक
साहित्य,कला,क्रिडा, संस्कृतीने
वारसा पुन:रूजीवीत होत असे
युवा विचारांचा ध्यास नवा
गरूड झेप घेत असे...
वसुधैव कुटुंबकम,सार संस्कृतिचा
असे मांगल्याचे प्रतिक
अमृताची गोडी मिळते
ते घर आमुचे एक
ज्ञानाला इथे पांझर फुटला
झाली विद्येची उत्क्रांती
बुध्दाचा सिध्दांत मानवा
विनाशाला मिळाली शांती
साधु,संत,थोर महात्मा
अद्वैताचा पुर्व जाणता
चिरवांच्छित आत्म शोधाचा
तुच विश्वात्मक भारता
उद्यमीत युवा संघटीत
तया बनेल वारसा स्वयंप्रकाशीत
मरगळलेल्या हातास देऊ बळ
ती ठरेल मानवतेची जात
वाद नाही संवाद जिथे
सहिष्णुता तिथे नांदते
काळजाच्या प्रतिबिंबात
आपुलकीची साद येते
विश्वाहुनी सुंदर आमुचा
भारत देश महान
परंपरेने रूजत गेला
मिळते चैतन्य आत्मसन्मान