शब्द अमृताचे बोल
शब्द अमृताचे बोल
अंतरी वसू दे,चैतन्याचा वास|
मुखी नाम घोष,शब्द अमृताचे बोल||
पेटवू ज्ञानियाचा दिप,उजळुया विश्व सारे
शब्द अमृतवाणी ,गातील मुके पाखरे
सुर मझं आतवर,शब्द अंतरीचे घर
मांडतो मी आज,मझं जीवनाचा सार
घडो माझ्या हाती, कार्य तया अनमोल
मानवता सारी रमली आभासी जगात
कसे डोळे उघडु,ग्रंथ पुस्तकाच्या पानात
हिच वेळ आपुली,जाणा शब्द अमृताचे
बोल ते हिताचे करू अंत अवगुणाचे
होऊ या सारे ,आपण मार्गी सफल
धनाने मन भरत नसे,त्याचे जीवन व्यर्थ
शब्दांनी काळीज भरत असे,तो खरा अर्थ
जपावा जिव्हाळा, तिथे टिकेल माणुसकी
जिथे शब्द अमृताचा परिवार, तिथे नसे कोणी परकी
शब्द अमृताचा संसार ,अंतरी सुखाने नांदेल
कितीदा जगावे,शब्द अमृताच्या बोलाने
अमृताहुनी गोड दु:ख, मानले मनाने
का?रडावे, का? झुरावे,शब्दात माझे मरण असावे
असे बोल व्हावे,सारे विश्व येऊनी मिळावे
अखंड सारे कळू दे,शब्द अमृताचे मोल