लालपरी
लालपरी
1 min
241
लालपरी दिसते जणू
धावत्या युगाची राणी
जना मनाच्या हृदयी वसली
रोज येतात तिच्या आठवणी
वाटसरूंची गर्दीच जमली
रोजची धावपळ तिची
वक्तशीर जणू तिच्याच अंगी
धाव घेते लालपरी आमुची
चालक,वाहक,जन सेवक
लालपरी कर्तव्य दक्षक
सुरक्षित जाते प्रवास वाहीणी
नसे रिकामी तिची बाक
शिवशाही, रनरागिनी नाव अनेक तिची
नव्या युगाची घेते भरारी
झेप मजला दुरवर गाठत असते
शोभुन दिसे रस्त्यावरती सुरेख सुंदरी
आमची लालपरी,लालपरी
