Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gautam Jagtap

Inspirational

3.5  

Gautam Jagtap

Inspirational

जीवन असे जगावे ज्यात कमजोर नसावे

जीवन असे जगावे ज्यात कमजोर नसावे

3 mins
197


जीवन हे प्रत्येकाला प्रिय असते आणि ते घडवायचे असते जीवनातला प्रत्येक क्षण आपल्या काळजाच्या कप्यात जपुन ठेवला पाहिजे की कधी कधी आपल्या जुन्या आठवणी उलगडताना बंद काळजाचा कप्पा एकांतात उघडून जीवनात साचलेल्या दु:खाला सावरून त्या वेगळ्या दुनियेत हरवून जाणे आणि पाखरा सारखं मुक्त संचार करत नभात उंच भरारी घेण्यास इतकं बळ निर्माण करायचं की थकवा जाणवलाचं नाही पाहिजे.

जीवन एक सुमधुर संगीता सारखं असावं की ज्यात मनमुराद आनंद घेता यावा कीती निर्मळ धुन त्या संगितात कि हृदयाचे स्पंदन तिथे आकर्षित होते.

जीवन गाणे रोजचे झाले त्यात अनेकांचे काही ना काही कारणाने रड गाणे चालुच असते. माझे जीवन जगण्याचं कारण काय? जीवन जगताना थोडा विचार करावा जर आपल्यावर वाईट परिस्थिती बितते तेव्हा आपण खंभीर अशी मजबूत भिंत निर्माण केली पाहिजे ज्यात आपण आतल्या कमजोरीवर मात करू शकतो. आणि डोक्यात घुसमळणाऱ्या वाईट प्रश्नांना मी शाबूत करू शकतो मी जीवन जगत आहे त्यात नकारात्मक विचारांची भर नको कधी कधी आलेल्या काळाला ही मी बजावून सांगतो मी माझ्या परिने जगत आहे. आणि जगण्याचा मार्ग शोधत आहे.काळाशी संघर्षात आपलं प्रतिउत्तर तयार असलं की काही बिघडत नाही कोणाचं पण आडतं फक्त रिकामटेकड्या गोष्टींचं, आहो काढून टाका सैरभैर वाईट विचारांची झापड मग स्वत: निर्णय घ्या परिवर्तनीय बाजुने जीवन एक शीतल छायेचा वृक्ष आहे त्यात आमुलाग्र बदलाचीं वाट शोधता येते. जगण्याच्या कमजोर स्थितीला असिम प्रयत्नानी आपण बदलू शकतो.


प्रत्येकाच्या जीवनात एक दिवस असतो त्या दिवसाची सुरुवात आपण कोठे केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे. सुरूवात हि आपल्या चांगल्या किंवा वाईट कामांवर होतं बाकी निर्णय घेणे हे आपल्यावर असतं चांगले काम केल्यावर चांगला मोबदला मिळतो पण वाईट काम केल्यावर वाटोळे झाले समजा "जिथे सुगंध तिथे दुर्गंध निर्माण करू नये,जिथे दुर्गंध तिथे सुगंध देण्याचं काम करा. कारण आजकाल कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही तरी सुगंधात दुर्गंध निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, जीवनात असे जगा ज्यात मरगळलेली अवस्था तुमच्यामुळे कोणाला नको जीवनाचे शिल्पकार आपण आहोत जीवन कशाप्रकारे घडवावे हे आपण ठरवायचे आहे. मुर्तीकार जेव्हा दगडापासून मुर्ती घडवतो ना तेव्हा अनेक छन्नी हातोड्याचा घाव देऊन त्या दगडाचा आकार एका भव्य मुर्तीच्या रूपाने होतो. त्याचप्रमाणे आपले संघर्षमय जीवन असाह्य वेदानांचा घाव झेलत नव्या आकाराने घडवायचे आहे. जीवनात अनेक त्रासापासून वेदना होत असतात. परंतू त्या वेदना सहन करणारा व्यक्तीच महान होऊ शकतो. मुर्ती लहान पण किर्ती महान असली पाहिजे ह्या म्हणी प्रमाणे जीवनात आपण यश कसे मिळवतो हा त्याचा जीवनरूपी प्रवास आहे जो लहान अशा महान आकाराने बनतो.ध्यासातून नवविचारांची प्रेरणा देणारा सिध्दांत व्हा जेव्हा जेव्हा मी यश मिळतो तेव्हा मला त्या निरागस बालपणाची आठवण येते मी तेव्हा ग्रामीण भागातला गावठी खेळपटू होतो आणि खेळात पार रमुन जायचो की मला शाळेच्या भिंती आड जास्त वेळ बंदिस्त होता आलं नाही शाळा म्हंटलं की कुठेतरी जाऊन बसायचो शाळेला वेळ झाली की मला तिथुन मोकळा श्वास मिळायचा आणि सुरूवात फक्त खेळापासून सुरू व्हायची खेळ कोणते पत्यांमधले अनेक खेळ रम्मी,पाचपत्ती,तिरट, त्यात अनेक क्लृप्त्या लढवून खेळ बनवायचो त्यातला मोरक्या मिचं असायचो डाव-डाव, गोट्या-गोट्या, विटी दांडू, पैसा-पैसा, चल्लस आठ,पळापळी,लंगडी- लंगडी, असे अनेक खेळांचा पारंगत खेळाडू मीच असायचो त्यात जिंकणार फक्त मिचं ह्या हिशोबाने माझा दिनक्रम असायचा 


लहानपणापासून हर एक कामामध्ये यशस्वी होण्याची मला आवड असायची ह्या गोष्टीत मी यश मिळवणारं हि आशा होती मला तरी अजुन पर्यंत मी यशासाठी कधी जिद्द सोडली नाही. "प्रयत्नरूपी परमार्थ घडत असतो." आणि सदोदित प्रयत्न केल्याने संधीचं सोनं होतं म्हणून जीवनात संधी जवळ येत असल्यावर ती साधण्याचा प्रयत्न मी जरूर करतो. जीवनात आपल्यापासून घडणाऱ्या चुका आपोआप आपल्या लक्षात येतात. कि ज्या पासुन आपण अनेक वेळा चुकतो तिथुनचं आपला मार्ग मोकळा होण्यास सुरुवात होते. "चुकणार तेव्हा शिकणार" ह्या उक्ती प्रमाणे जीवनात अनेक चुका घडल्यावर त्या समजण्यास भाग पाडतात. कधी कधी चुकल्यावर मुकु नका स्वत:वर विश्वास असू द्या जीवनात कधीच अपयशी होणार नाही. आणि कमजोर बनणार नाही हा आत्मविश्वास कायम असू द्या.


जीवन में हर एक पल कामयाबी की तरफ आगे बढते जाओ

कमजोरी को जड से निकालो और आपणी एक अलग सोच बनाओ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational