संसार
संसार
संसाराचा आधार ती
महान एक स्त्री शक्ती
दु:खात ही हसणारी
कसून करे प्रगती
खांब बनते जीवाचा
होते दिवा संसाराचा
पतिचा मान जपते
ठाव घेते सगळ्यांचा
संसाराचा वसा घेते
होते संस्काराचा दीप
बळ देते ती मुलांना
घेण्यास सांगते झेप
तिच्या आड दु:ख फार
नसे कुणास सांगते
अपमान हि झेलत
आतल्या आत कुडते
आदर वाटावा तिचा
आधार द्यावा तिलाही
प्रेमाच्या गोड शब्दात
तिचे ऋण कमी नाही