निसर्ग विश्व विधाता
निसर्ग विश्व विधाता
1 min
304
विश्व विधाता, निसर्ग माझा
साक्षात अवतरला परमात्मा
सारे विश्व, भुलली तुजला
पाहुन निसर्गा, मिळे तृप्ती आत्मा
नांदतात तुझ्यात, निष्पाप पशु-प्राणी
गुणगुणतात सारे तुझ्या आठवणी
वाटे मजला स्वर्गाहुनी सुंदर निसर्ग
माझा मी प्रिय निसर्गाची गातो गाणी
पाखरांचा गलका, प्राण्यांची झडप
खेळ चाले जीवाचा तुझ्या सहवासात
मिळे सुख, शांती तू आनंदाची सावली
हे निसर्ग माऊली, हवी तुझी साथ