STORYMIRROR

Sneha Salunke

Romance Others

3  

Sneha Salunke

Romance Others

वचन!

वचन!

1 min
478

अर्पण केले तुला तनमन 

एकनिष्ठ होऊनी दिलेस मला तू वचन

मी कटीबद्ध यामिनी 

तू माझा सांगाती!

 

मागणे एकच आहे आता

पूर्ण कर माझी मनीषा 

सौभाग्यं लेणे लेऊ दे मजला

ऐश्वर्याचे जिणे जगू दे मजला


संसारात रमू दे मजला

मातृसुख अनुभवू दे मजला

स्वामित्व तुझे पत्करु दे मजला

देवळातल्या देवत्वाचा साक्षीभाव ठेवूनी

 

नात्यात वचनबद्ध तू हे जाणते मी

कळते तुला माझ्या उरातली वेदना 

अगोचर झाल्या आज भावना 

सावरलेस कैकवेळा तू मला


तुझ्या भरभक्कम आधाराची गरज मला

एकांती दिलेल्या वचनांचे स्मरण देते तुला

त्वरित वचनपूर्ती करून पुर्णत्वास

ने नात्यामधली अपूर्णता!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance