STORYMIRROR

Sneha Salunke

Inspirational Others

3  

Sneha Salunke

Inspirational Others

वरताण!

वरताण!

1 min
489

पदोपदी होतो अपमान 

आपण विसरु न द्यावे भान 

हरपू न द्यावे देहभान 

सगळ्यांचा आस्वाद घेऊ 

मारून एक तान

अपमान काय आणि सन्मान काय 

दोन्हीत ठेवा वर्तन समान 

आत्म्याला अहंकार मुक्त करावे 

मनाला आनंदी ठेवावे 


कुणी निंदा कुणी वंदा सोडू नये स्वानंदा 

मजेत राहावे मजेत जगावे 

मनाला पटेल तेच करावे 

अपमानाचा करत बसलो विचार 

तर दुःख वाट्याला येणार 

अपमान करणाऱ्यांचे काय जाणार? 

वाईट कर्माचा तो धनी होणार 

सगळ्यांवर होऊन वरताण 

आपण विसरू सगळे ताण!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational