STORYMIRROR

Sneha Salunke

Others

3  

Sneha Salunke

Others

रक्षाबंधन!

रक्षाबंधन!

1 min
110

आज येते आठवण माहेराची 

सोबत असते जन्मभर भावाची 


बालपण आपले मजेत गेले 

ताणतणाव शब्दकोषात नव्हते


एकमेकांची उणीदुणी काढत होतो 

भांडत होतो पण तुटत नव्हतो 


खोडकर तुझा स्वभाव होता 

बाहुल्यांचे माझ्या डोळे फोडत होतास


अभ्यासात तुला रस नव्हता

झोपा काढण्यात हुशार होतास 


बैठे खेळ तुला आवडत होते 

मैदानी खेळाचे तुला वावडे होते


क्रिम बिस्किटे मोजून खायचास

मला देताना तुझा हात आखडायचा! 


ढोलकी वाजवण्यात तू तरबेज आहेस 

दैवी देणगी तुला लाभली आहे


बहिणींचा तू लाडका आहेस

माहेरची तू आठवण आहेस 


कविता ऐकून धावत येशील 

नात्याचे पावित्र्य राखशील


कुंकुमतिलक करीन कपाळी 

मनगटी बांधीन रेशीम राखी! 


एकमेकांचे रक्षण करू

भावाबहिणीच्या नात्याची वीण घट्ट करू!


Rate this content
Log in