नुपूर!
नुपूर!

1 min

87
कुणीतरी येऊन हळूच कुजबुजले,
किणकिण बांगडयांची हितगुज करीत,
सोनसाखळी पायी करिता अंमळ नाद,
अवडंबर ते कसे माजले?
वीणेच्या तालावर सुरझंकार करीत,
हलकेच साद घातली कुणी?
कानांवर पडले सूर सप्तरंगी!
थिरकणाऱ्या पावलांची नुपुरे छुनछुन,
ध्वनीलहरींनी नादावतील आसमंत!
तन्मयतेने नुपूर शृंगारिक,
नर्तनासी सदैव तत्पर!
अवलोकिता चर सृष्टीचे,
भान हरपले वसुंधरेचे!
सुरांचा आविष्कार असावा किती गोड,
नुपूरांना त्रिताल, झपतालाची जोड!