दर्पण
दर्पण

1 min

187
सर्वस्व केले तुला अर्पण
दासी होऊनी केले आत्मसमर्पण
प्रेम कुंडात दिले भावनांचे तर्पण
सुरक्षित आश्रयाखाली काढले गर्भारपण
कशास पाहू मी दर्पण ||१ ||
दुष्ट विचारांचा धुरकट आरसा
त्यातून झळकते मलीन प्रतीमा
हीन विचारांनी क्षीण होते प्रतिभा
विवरात अडकून पडते कल्पना
कशास पाहू मी दर्पण ||२ ||
मनाजोगते जगणे ठाऊक मला
मनाच्या दर्पणात डोकावणे ठाऊक मला
मायेच्या पदराचा खुणावतो आकर्षक शेला
माझ्या मनी झुलतो स्वप्नांचा झुला
कशास पाहू मी दर्पण ||३ ||
दैवी देणगीचा लाभला वारसा
विलक्षण प्रतिभेला मिळे चालना
स्वच्छंद जीवनाची आस मजला
परमात्म्याचे लाभले वरदान मला
कशास पाहू मी दर्पण ||४||