हौशी!
हौशी!

1 min

35
प्रोत्साहन मिळाले समूहात
कवयित्री झाले उत्साहात
हौसेने सर्वत्र मिरवते
समूहाचे गुणगान गाते
निंदकांची खंत नाही
हौसेला मोल नाही.
उत्साह ओतप्रोत भरला आहे
जीव कवितेत गुंतला आहे.
व्यापताप अनेक आहेत
ताणतणाव जीवघेणे आहेत
तरीही उत्साह जिवंत आहे
भरभरून लिहायचे आहे
भावनांचे प्रकटीकरण करायचेआहे
नामवंत कवयित्री व्हायचे आहे
सर्वांच्या सहकार्याने शक्य आहे.
प्रतिसाद वाचकांचा उदंड मिळावा
उत्साहात कवितांच्या सजावटीला उठाव यावा!