प्रतीक्षा तुझ्या बरसण्याची.
प्रतीक्षा तुझ्या बरसण्याची.

1 min

26
कोरड पडली मनाला, शुष्क झाले ओठ.
वाट पाहून थकले, कासावीस झाला जीव!
तुझ्या बरसण्याची, आतुरतेने पाहाते मी वाट.
असा झेपावत ये अंगावर,
भिजवून टाक मला एकवार!
पहिली सर चिंब भिजवेल मनासी.
आठवणींचा डोळयांत दाटून येईल पूर!
बंद हृदयाच्या कप्प्यात हळूच डोकावशील.
रोमांचित होईल काया, मनासी गारवा मिळेल.!
संवेदनशील मनाला सोसवेना भार विरहाचा.
प्रज्वलित होतील आशा प्रेमी जनांच्या!
बरसण्याची तुझ्या ओढ आहे सर्वांना!
शेतकरी, मानकरी आसुसले तुझ्या बरसण्याला.
मेघ गर्जना ऐकण्यास प्राणीमात्र सरसावले.
चाहूल घेण्यास पक्षी विहंगी भरारले!
जलप्रवाह दुथडी भरून वाहातील.
बी बियाणे अंकुरेल. निसर्गातूनी गीत झंकारेल!