तुला कळणार नाही...
तुला कळणार नाही...


तुला नाही कळणार...
भाव माझ्या मनातले
शब्द माझ्या ओठवरचे
तुला नाही कळणार
उमलणाऱ्या कळीचा आनंद
आणि कोमेजणाऱ्या फुलाचे दुःख
तुला नाही कळणार
ते माझं तूझ्या आठवणीत एकांतात रडण
आणि स्वतःच स्वतःला सावरण
तुला नाही कळणार
माझ्या ओघळणाऱ्या अश्रूंची किंमत
आणि नाही होणार कधी माझ्या भावनांची जाणीव
तुला कळणार नाही
कधी माझ्या हास्यमागील दुःख
आणि दुःखात ते तडफडणं