Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rupali Korale

Romance Tragedy

2.8  

Rupali Korale

Romance Tragedy

तुला कळणार नाही...

तुला कळणार नाही...

1 min
62


तुला नाही कळणार...

भाव माझ्या मनातले

शब्द माझ्या ओठांवरचे


तुला नाही कळणार

उमलणाऱ्या कळीचा आनंद

आणि कोमेजणाऱ्या फुलाचे दुःख


तुला नाही कळणार

ते माझं तुझ्या आठवणीत एकांतात रडणं

आणि स्वतःच स्वतःला सावरणं


तुला नाही कळणार 

माझ्या ओघळणाऱ्या अश्रूंची किंमत

आणि नाही होणार कधी माझ्या भावनांची जाणीव


तुला कळणार नाही

कधी माझ्या हास्यमागील दुःख

आणि दुःखात ते तडफडणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance