वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी
वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी
यमुना किनारी, सावळा मुरारी
वाजवितो श्याम आज
धुंद धुंद बासरी
मुरलीचा नाद आज
ऐकू येईल काना
यशोदेचा तान्हुला गं
वेड लावतो मना
सावळी ही मूर्ती त्याची
दिसते किती गोजिरी
वाजवितो श्याम आज धुंदधुंद बासरी
यमुनेचे पाणी ही
गोड नाद बोले
बासुरीच्या सुरावरी
तन मन डोले
हळू चंद्रमा नभात
हसे अंबरी
वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी
गोपींच्या मनीचा तो
भाव जाणुनी
रासक्रीडा रचली तू
वृंदावनी
तुझ्या पायी वेडी
झाली गोकुळ नगरी
वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी
कानाला गं राधेची
चाहूल लागली
पाण्यात साऱ्या मासळ्यांची
कुजबूज झाली
श्यामवर्ण कान्हालाही
गौर राधा साजिरी
वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी