नांदा सौख्यभरे
नांदा सौख्यभरे


मेहंदी रेखिली, ती
नाजूक सुंदर पाऊले
ते अंगावरती
भरजरी शालू शेले
ती सलज्जमुद्रा
नजर किंचित खाली
गोऱ्या गालावरती
लज्जेची ती लाली
थरथरता तो हात
दिला तुझ्या हाती
सप्तपदीने जोडली
सात जन्माची नाती
मायेचे ते पाश
तुझ्यासाठी तोडले
तुझ्याचसाठी प्रेमाचे
मायबाप ते सोडले
नांदा सौख्यभरे ते
म्हणती रूद्ध स्वराने
देती आशीर्वचने
भरलेल्या कंठाने