सूर्यदेव तापलाय
सूर्यदेव तापलाय


सूर्यदेव तापलाय
ओकतोय आग
मलाही मग
आला राग
मग मी घेतली उंच
आकाशात झेप
मारून सूर्य काखोटीला
पृथ्वीवरती आलो थेट
खाली आल्यावर थेट
कोंबले गाडीत
लांब कोंडून ठेवला
अंधाऱ्या माडीत
ब्रह्मांड बुडाले काळोखात
पसरला सगळीकडे अंधार
पसरली सगळीकडे घबराट
जो तो झाला सैरभैर
देवा मानवानेसोडला धीर
आता सृष्टी जगेल कशी
सूर्या वाचून तगेल कशी
अखेर सूर्याला आली
त्यांची दया
उडून गेला आकाशात
माझा डोळा चुकवोनीया
तापलास तरी चालेल
बाबा दडी नको मारू
तुझ्या विना कसा
चालेल सृष्टीचा तारू
सगळ्यांनाच आता
हायसे वाटले
पृथ्वीचे रहाटगाडगे
पुन्हा सुरू झाले