STORYMIRROR

Prashant Gamare

Romance Inspirational

3  

Prashant Gamare

Romance Inspirational

श्रावणसरी

श्रावणसरी

1 min
219

संपता ओला आषाढ महिना,

पडती सरसर श्रावण जलधारा.. 

कूस बदलतो क्षणात निसर्ग,

देतो ऊन-सावली पाऊसवारा...!


आनंदाने वनी नाचते श्रावणी, 

मयूरासंगे फुलवून पिसारा..

येईल अवचित पाऊस,

करते नृत्यातून इशारा..!


कोल्ह्याचेही लग्न लाविते,

ऊन-पावसाची स्वारी..

सौख्याने हलविते तनू,

शेतातील इवलीशी ज्वारी..!


हलक्या सरींनी नटले,

वसुंधरेचे रुप सगळे...

सतरंगी करुन कमान,

दृश्य इंद्रधनुचे आगळे..!


असा श्रावण नटखट,

कृष्णापरी त्याची खटपट..

मानवी जीवनात भरतो,

रंग सौख्याचे झटपट...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance