एक कविता त्यांंच्यासाठी
एक कविता त्यांंच्यासाठी
एक कविता आपणही लिहूया...
बालपणीच्या आठवणी सांगणारी..
निसटलेल्या क्षणांना मनात साठवत,
डोळ्यांत हळूच पाणी आणणारी..!
वर्गात दंगामस्ती करतानाच,
मैत्रीच्या आणाभाका घेणारी...
अभ्यासाची टंगळमंगळ करून,
कल्पनेत हरवून जाणारी..!
कॉलेज ते करिअर प्रवासात,
प्रेमात आकंठ बुडणारी....
छोकरी आणि नोकरीच्या शोधात,
मग आयुष्यभर फिरणारी...!
सांसरिक सुख उपभोगताना,
हम दो हमारे दो म्हणणारी...
सारे काही कुटुंबासाठी करताना,
दिवसरात्र त्यांच्यासाठी झिजणारी...!
वार्धक्य वेळीच ओळखताना,
नातवंडांसह घरात खेळणारी...
भूतकाळ आपला आठवत,
एकांतात स्वतःतच रमणारी...!
एक कविता अशीच लिहूया,
सुख-दुःखात सामील होणारी...
दुनियादारी करता करता,
सर्वांनाच आपल्यात सामावणारी..!