तुझ्याशी बोलताना...
तुझ्याशी बोलताना...


आज तुझ्याशी बोलताना
खूपच आलं मन भरून..
वाटलं नव्हतं बोलशील एवढं,
स्वतःहून माझ्याशी कॉल करून..!
साठवलं लगेच मनात तुझं,
'ऐक ना' म्हणत बोलणं..
खुशाली विचारताना हळूच
काय चाललंय विचारणं..!
गतकाळच्या रम्य आठवणींना,
मिळाली मग थोडी चालना..
तुटलेल्या ह्रदयातून पुन्हा,
जोडल्या गेल्या हळूच भावना...!
खूप वेळ आपलंच बोलताना,
निघाले इकड-तिकडचे विषय..<
/strong>
पण खरंच तसा नव्हता,
त्यात कोणताच आशय..!
बरंच काही बोलायचं होतं,
पण आवरतं घेतलं संभाषण
वेळेचंही मग पाळून बंधन,
भावनांवर ठेवलं नियंत्रण..!
मी म्हणालो परत केव्हा?
ती म्हणाली असंच कधीतरी..
जेव्हा मिळेल वेळ तेव्हा,
होईल बोलणं थोडंतरी..!
कॉल तिचा संपवताना,
डोळ्यात तरळले पाणी..
कानात निनादत राहिली,
भावमधूर तिची वाणी..!