सांग सखे....
सांग सखे....


त्याच वाटेवर कितीदा तरी,
डोळे लावून बसलो होतो..
तू येशील परतून म्हणून,
जागचाही हललो नव्हतो...!
डोळ्यांत तुझी आसवे घेऊन,
आशेच्या किनाऱ्यावर रडलो..
निराशेच्या गर्तेत वारंवार असा,
बापडा मीच का सापडलो..?
नको करूस उशीर आता,
संपत आलाय संयम माझा...
मनात आणून हिंमत थोडी,
हातात दे ना हात तुझा..!
ढळला तुझा निर्णय जरी,
कळवून टाक स्पष्ट मला...
सांग सखे खरंच एकदा,
आवडते का माझी साथ तुला...?