STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

3  

sarika k Aiwale

Romance

हरवलेल स्वप्न

हरवलेल स्वप्न

1 min
418

नको न मना असा बेभान वाहू 

प्रीतीचा वारा असे उनाड साहू 

खोल गाठला तळ त्या आसवानी 

मन झुरणी हरवले ते स्वप्न पाहुनी 

नजरेत नको अश्रूंचे झरे वाहते ठेवू 

आतुर होईल कोणी असे रूप नको दावू 

रात्र गाते अधूरया त्या गाथेची कहाणी 

भावेल कोणा आसुयेतील कोवळे बहाणे ही

नको मना लिहू हरवल्या स्वाप्नाची गाथा 

वळणावर कोरलेल्या तुझ्या ओळखीच्या कथा 

नाहीच देणार कोणी ओळख त्या वाटेवर.. 

बदलली ग पायवाट ती बदलली स्वप्ने मनीची 

फिरुन येते वळण या जीवनी आगतुक नको होऊ 

असेल तुजसम कोणी दुज त्याचे स्वप्न नको हिरावू 

हरवले ते स्वप्न होतं एक तत्व तू जपल 

फिरूनी येतं वादळ न उधळतो सारेच डाव 

नको करू आटापिटा विसरला भाव आठवण्याचही 

नाहीच जगली स्वप्न तू जी ही इतरांसाठी पहिलेली 

नको न मना असा बेभान वाहू 

प्रीतीचा वारा असे उनाड साहू 

खोल गाठला तळ त्या आसवानी 

मन झुरणी हरवले ते स्वप्न पाहुनी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance