Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubham Kuwar

Romance Inspirational

3  

Shubham Kuwar

Romance Inspirational

संसार...

संसार...

1 min
66

जीवनाच्या सहवासात,

हवी साथ तुझी;

मागणं घालतो एकच,

साथ दे ती शेवटपर्यंतची...

वाट ही वळणावळणाची,

आले अनेक अडथळे;

तुझ्या साथीने मात्र,

तेही झाले सोपे...

असावी साथ तुझी,

होईल हे जगणेही सोपे...

संसार हा आपला,

राहो असाच अपरंपार;

साथ ही जन्माजन्माची,

याला न पडो गाठ...

धनी आहे मी तुझा,

तू माझी सुगरण;

अशीच साथ तुझी माझी,

होऊ आपण वृद्ध...

असावी साथ तुझी,

होईल हे जगणेही सोपे...

कोण आपले कोण परके,

या भांडणात पडायचे नाही;

वयाच्या या उतारवयात,

फक्त असू दे साथ तुझी...

हवी तू माझ्या जवळ,

माझ्या शेवटच्या क्षणी;

डोळे भरुन पाहीन तुला,

न घेईल श्वास शेवटचा...

असावी साथ तुझी,

होईल हे जगणेही सोपे...

Rate this content
Log in