STORYMIRROR

Shubham Kuwar

Others

3  

Shubham Kuwar

Others

गर्भाचे बोल...

गर्भाचे बोल...

1 min
11.9K

आई तुझ्या गर्भाशयात,

राहायचंय गं मला...

नको ना! घेऊ जीव माझा,

येऊ दे नां या जगात मला...


नाही घालणार मागणी कसलीच,

नाही लादू देणार ओझे तुझ्यावर...

एकच मागणी आहे गं माझी,

दे नां! फक्त जन्म मला...


या जगात यायचयं,

न मुक्त पाखरुवाणी,

वावरायचयं गं मला...


आई तुझ्या गर्भाशयात,

राहायचंय गं मला...


खुप साऱ्या आठवणी,

जपुन ठेवायच्याय मला...

न एक एक क्षण,

तुमच्यासंग घालवायचायं गं मला...


गर्भपात गुन्हा आहे!

असं मी ऐकलयं गं...

पन ते फक्त औपचारिकतेसाठी,

ते आज कळलयं गं मला...


आई फक्त तुमच्यासाठी,

या जगात,

यायचयं गं मला...


आई तुझ्या गर्भाशयात,

राहायचंय गं मला...


Rate this content
Log in