गझल
गझल


कानी तुझा आवाज घुमतो आहे
स्वप्नात तुझाच भास होतो आहे।। धृ।।
तू दूर गेल्यावर, याद तुझी करतो आहे
तू नसल्यावर, जीव माझा तळमळतो आहे।।
तू जातेस तिथे, तुझी आठवण येत आहे
तुझ्या छमछम पावलांचा भास होतो आहे।।
तुझा तो प्रेमळ बाणा, आशावादी आहे
मनाला स्पर्शून, तसा भास होतो आहे।।
कानी तुझा आवाज घुमतो आहे
स्वप्नात तुझाच भास होतो आहे।।धृ।।