गजल
गजल


जीवनात खुप काही केले असेहि वाटत नाही
जीवनात मौजमजा केली ,तसेहि वाटत नाही।।धृ
आयुष्यात दुःखच झेलीत गेलो, वेचित गेलो
दुःखाच्या वाटेवर काटे कधीच टोचत नाही।
मानसा सारखा मानुस होता आले एवढेच,
आयुष्यात कष्टाचं चीज झाले असे वाटत नाही।
नाव कमवायला आयुष्य घालवावे लागते
बदनाम व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही ।
त्यागाची आणि कष्टाची जाणीव लागते
अनुभवाची जोड लागते, तसी प्रगती होत नाही
लाज वाटते इभ़तीची, कामधंद्याची, स्व ची
हर हुन्नरी मानसाला कसलीच लाज वाटत नाही।।