तू ओसरीच्या आत
तू ओसरीच्या आत


तू ओसरीच्या आत
येऊ नकोस आता।
मनातील भावना
ओकू नकोस आता।
सांगु कसे तुला मी
सारे अबोल आहे,
रस्त्यावरचे काटे
सारू नकोस आता।
गडद झाल्या वाटा
चालणे थांबले आहे,
नयनातील अश्रूं
गाळू नकोस आता।
माझा तुझा आधार
एकच ध्यास आहे,
मरण्या अगोदर,
नको अंतर आता।।