संवेदनशील कवी
संवेदनशील कवी


कवी, कवी असतो
हातात पेन डोक्यात विचार
वेडा होऊन जातो
तो कवी असतो।
कवी, कवी असतो
शब्दाचा शिल्पकार
रचनाकार होतो
तो कवी असतो।
कवी, कवी असतो
संवेदनशील मनाचा
जाग्रत वृतीचा
तो कवी असतो।
कवी, कवी असतो
प्रेमावर लिहितो
सत्याचा आग्रह धरतो
तो कवी असतो।
कवी, कवी असतो
विनयशील असतो
नम्रपणे वागतो
तो कवी असतो।
वास्तववादी असतो तर,
कधी विद्रोही
तो कवी असतो।
अज्ञान दूर करतो
विज्ञानवादी होतो
तो कवी असतो।
साहित्यिक असतो
कथा, कादंबरी, आत्मचरित्र लिहितो
तो कवी असतोच,
उत्तम लेखक सुद्धा असतो।।