पाखरांना आता सावरू लागलो
पाखरांना आता सावरू लागलो

1 min

284
पाखरांना आता सावरू लागलो
अंगणी मी आता वावरू लागलो ।।धृ।।
शांतीचा संदेश तो गौतमाचा
मी मनोमनी पांघरू लागलो
दुःखाचे कारण शोधले तरीही
बोट आता धम्माचे धरू लागलो।
मंदिरात जाणे आता मी टाळले
विहारी ध्यान धारणा करू लागलो।
पाखरांना आता सावरू लागलो
अंगणी मी आता वावरू लागलो।